English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - शासकीय आश्रमशाळा

शासकीय आश्रमशाळा समूह

योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र राज्यात डोंगराळ व दुर्गम भागात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांची सामाजिक व शैक्षणिक प्रगती होण्यासाठी सन 1972-73 पासून क्षेत्र विकासाचा दृष्टीकोन स्वीकारण्यात आलेला असून अशा भागाचा मूलभूत विकास व्हावा आणि त्याचा फायदा सर्वांना व्हावा, यासाठी तेथे मूळ केंद्रस्थान म्हणून आश्रमशाळा निर्माण करण्यात आल्या. या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची इ.10 व 12 वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध असते. सदर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना निवास, भोजन, गणवेश,आंथरुण-पांघरुण, पुस्तके व इतर लेखन साहित्य इत्यादी सुविधा शासनाकडून मोफत पुरविण्यात येतात.

• लाभार्थी विद्यार्थी अनूसुचित जमातीचा असावा. • प्रवेशाच्या वेळी मुला-मुलीस 31 जुलैला 6 वर्षे पूर्ण झालेली असावी. • आश्रमशाळेच्या 1 कि.मी. अंतरावर राहणारी मुले-मुली अनिवासी म्हणून व त्या क्षेत्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना निवासी म्हणून प्रवेश देण्यात येतो. • आश्रमशाळेत प्रत्येक वर्गात निवासी 40 उर्वरित 10 विद्यार्थ्यांपैकी 5 अनुसूचित जमातीचे व 5 शालेय कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखी असून सदर विद्यार्थी अनिवासी म्हणून असतील. • आश्रमशाळेमध्ये मुला-मुलींचे प्रमाण 50:50 प्रमाणे व 50 टक्के मुली मिळाल्या नाही तर विद्यार्थिनी क्षमता किमान 33 टक्के आवश्यक. जर सदर टक्केवारी पूर्ण झाली नाही तर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देवून क्षमता पूर्ण करणे. • आश्रमशाळेमध्ये प्रत्येक वर्गात शारीरिकदृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण ठेवण्यात येते. • दारिद्रय रेषेखालील आदिवासी जमातीच्या भूमिहीन/अल्पभूधारक विद्यार्थ्यांना प्राधान्य.

• प्रत्यक्ष प्रवेश देतेवेळी अनुसूचित जमातीचा दाखला. • जन्मतारखेचा दाखला. • आई-वडिलांचे प्रतिज्ञापत्र. • पहिली व्यतिरिक्त इतर वर्गातील प्रवेशाकरिता पूर्वीच्या शाळेतील शाळा सोडल्याचा दाखला.

संबंधित मुख्याध्यापक, शासकीय आश्रमशाळा.