English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - वसतिगृह - शासकीय वसतिगृह

आदिवासी मुला-मुलींकरिता शासकीय वसतिगृह

योजनेचे स्वरूप

अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाची सोय व्हावी व त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी या उद्देशाने सदर योजना सुरू करण्यात आलेली आहे. शासकीय वसतिगृहात गुणवत्तेनुसार प्रवेश देऊन त्यांना निवास, भोजन, आंथरुण, पांघरुण, पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक साहित्य मोफत पुरविण्यात येते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे निर्वाहभत्ता अदा करण्यात येते. 1. विभागीयस्तर रुपये 800/- 2. जिल्हास्तर रुपये 600/- 3. तालुकास्तर रुपये 500/- 4. या व्यतिरिक्त मुलींना स्वच्छता प्रसाधनासाठी दरमहा रुपये 100/- अदा करण्यात येते.

• विद्यार्थी आदिवासी व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. • विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लक्ष पेक्षा कमी असावे. • तालुकास्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 7 वी पास असणे आवश्यक आहे. • जिल्हास्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 10 वी पास असणे आवश्यक आहे. • विभागीयस्तरावर प्रवेश घेवू इच्छिणारा विद्यार्थी हा इयत्ता 12 वी पास असणे आवश्यक आहे.

1. विहित नमुन्यात शाळा सोडल्याचा व प्रवेश घेतल्याचा दाखला. 2. गुणपत्रिका 3. जातीचा दाखला 4. उत्पन्नाचा दाखला 5. वैद्यकीय प्रमाणपत्र 6. आधार कार्ड 7. चालू शैक्षणिक वर्षातील बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक राहिल. https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करणे अनिवार्य राहिल.

https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा.

1) संबंधित वसतिगृहाचे गृहपाल 2) प्रकल अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प