English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - इतर शैक्षणिक योजना - पुस्तक पेढी योजना

पुस्तक पेढी योजना

योजनेचे स्वरूप

केंद्र शासन जनजाती मंत्रालय, नई दिल्ली यांचे परिवहन क्र. 19012/05/2010/शिक्षण दिनांक 21 जून, 2010 नुसार वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय, तंत्रनिकेतन, L.LB. व एम.बी.ए. या अभ्यासक्रमांकरिता लागणा-या पुस्तकांची संख्या जास्त व खूप महाग असल्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करण्यास अडचणी येतात. सदर पुस्तके खरेदी करण्याकरिता खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे महाविद्यालयांना रक्कम मंजूर करण्यात येते. पदवी अभ्यासक्रम\nअभ्यासक्रम मंजुर रक्कम 1 संच (दोन विद्यार्थ्यांकरिता) 1. वैद्यकीय रुपये 7500/- 2. अभियांत्रिकी रुपये 7500/- 3. पशुवैद्यकीय रुपये 5000/- 4. कृषी रुपये 4500/- 5. तंत्र निकेतन रुपये 2400/- पदव्युत्तर अभ्यासक्रम अभ्यासक्रम मंजुर रक्कम 1 संच (एक विद्यार्थ्याकरिता) 1. विद्यापीठमान्य पदव्युत्तर अभ्यासक्रम वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय व इतर तांत्रिक अभ्यासक्रम रुपये 5000/- 2. एल.एल.बी व एल.एल. एम रुपये 5000/- 3. चार्टर्ड ॲकाउन्टन्ट रुपये 5000/- 4. एम.बी.ए (2 वर्ष) किंवा तत्सम अभ्यासक्रम रुपये 5000/- 5. जैव विज्ञान रुपये 5000/-

• विद्यार्थी हा अनुसूचित जमतीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. • त्यानी वैद्यकीय, दंत,होमिओपॅथी,युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार ,व्यवसायोपचार इत्यादी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेला असावा. • त्याची वर्तणूक, हजेरी व प्रगती समाधानकारक असावी.

• विद्यार्थ्याचे अनुसुचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र • शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयाचे (बोनाफाईड सर्टिफीकेट) विद्यार्थ्याचे गुणपत्रक • महाविद्यालयत अजु.जमातीचे किती विद्यार्थी शिक्षण घेत आहे.याबाबत माहिती • उपन्नाचा दाखला • विद्यार्थ्याचे आधारकार्ड • तीन वर्षातून एकदा महाविद्यालय बुक बॅक पुस्तक पेढीकरिता प्रस्ताव सादर करु शकतो.

संबधित प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय येथे उपलब्ध

संबधित प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय