1) विशेष केंद्रीय सहाय्य योजना
2) आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना
3) भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत योजना
4) ठक्कर बाप्पा वस्ती सुधार कार्यक्रम
5) सांस्कृतिक संकुल बांधणे
6) गावबंदी योजना
गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त भागातील काही गावातील ग्रामस्थांनी उत्स्फुर्त पुढाकाराने नक्षलवाद्यांविरुद्ध धाडस दाखवून नक्षलवाद्यांना गावबंदी केलेली आहे. अशा गावांच्या विकासासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना सुरु करण्यात आली. यामध्ये छोट्या स्वरुपाचे रस्ते, शाळांच्या इमारती, पाणी पुरवठा योजना, विहिरी खणणे, अंगणवाडी खोलीचे बांधकाम व दुरुस्ती, पिण्याच्या पाण्यासाठी पाईपलाईन टाकणे, पाणवठा तयार करणे, बोडीचे बांधकाम व दुरुस्ती, व्यायामशाळा इ. स्वरुपात कामे घेण्यात येतील.
गृह विभागाकडून वेळोवेळी जो काही भाग नक्षलग्रस्त म्हणून घोषित केला जाईल, अशा आदिवासी उपयोजना क्षेत्रातील नक्षलग्रस्त भागातील ज्या गावांनी पुढाकार घेऊन नक्षलवाद्यांना गावबंदी केली आहे.
1. गावाच्या ग्रामपंचायतींचा ठराव आणि ग्रामसभेचा ठराव आवश्यक राहील 2. पोलीस अधिक्षकांकडील अहवाल जिल्हाधिका-यांच्या शिफारशीसह आवश्यक राहील.
गरज नाही
पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय