English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
क्षेत्र विकासाच्या योजना - क्षेत्र विकासाच्या योजना - आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना

आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना

योजनेचे स्वरूप

सदर योजना ही केंद्रीय सहाय्य योजना असून या अंतर्गत आराखडयाचे अनुषंगाने आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणेकरिता नवीनतम व कार्योपयोगी योजनेचा यामध्ये समावेश केला जातो. तसेच आदिम जामीतीची योजना ही चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी व भामरागड या प्रकल्प कार्यालयातील माडिया, कोलाम व कातकरी या जमातीकरिता राबविली जातात. या योजनेअंतर्गत दरवर्षी नवीन योजना घेण्यात येतात. खालील योजना यापूर्वीच्या वर्षामध्ये मंजूर झालेल्या आहेत :- 1. आरोग्य मार्गदर्शन शिबीर 2. अंगणवाड्यांना अतिरिक्त सहाय्य. 3. वैदु प्रशिक्षण व वैद्यकीय सेवा 4. हेल्थ ऍ़निमिटर प्रशिक्षण 5. घरकुल/आवास 6. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ग सुरू करणे 7. आधुनिक तंत्रज्ञानासंबंधित मार्गदर्शन शिबीर 8. सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनासाठी साहाय्य 9. हातचलित बोअरवेल, उघडी विहीर बांधणे, नवीन विहीर खोदणे 10. भूमिहीनांना जमीन 11. औषधी वनस्पतींची लागवड व फलोद्यान 12. शेतीसाठी अवजारांचा पुरवठा 13. रोप वाटिका 14. उपसा सिंचन 15. ठिबक व तुषार सिंचन 16. मळणी यंत्राचा पुरवठा करणे 17. जनावरांचा कृत्रिम रेतन कॅम्प आयोजन, लसीकरण व आरोग्य तपासणी 18. दुधाळ जनावरांकरिता गोठा शेड 19. बेरोजगारांना आधुनिक संगणक प्रशिक्षण 20. वराह पालनासाठी अर्थसाहाय्य 21. हॅन्डीक्राफ्ट युनिट स्थापना 22. शेळी गट वाटप 23. स्थलांतरित पीटीजीकरिता उत्पादन विक्री केंद्र स्थापना 24. पाच किलोमिटर लांबीचे जोडरस्ते, छोटे लघुपुल व सिडीवर्क बांधणे 25. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (नालाबंधी शेततळे, वनतळे, जमीन सपाटीकरण, चॅकडॅम बांधणे) 26. वायुसौर हायब्रीड ऊर्जा प्रकल्पास 10 टक्के अनुदान 27. आदिम जमातीच्या 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे इत्यादी.

1. शासन निर्णय व शासनाने निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार व कातकरी, माडिया व कोलाम गोंड जमाती लाभार्थी 2. टिएसपी, ओटीएसपी, माडा, मिनीमाडा या क्षेत्रात असलेली आदिम जमातींची गावा अंतर्गत येत असलेले व आदिम जमाती अंतर्गत येत असलेले लाभार्थी. आरोग्य विषयक योजना - 1. ज्या गावांमध्ये आदिम जमातीचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. ज्या गावात अशी शिबीरे झालेली नाही तसेच कुपोषण व तत्सम दुर्धर आजार उद्भवलेले आहेत अशी गावे. रोजगार व उत्पन्न वाढीच्या योजना- 1. लाभार्थी आदिम जामातीचा असवा अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल 2. लाभार्थीचे कमीत कमी 10 वी पर्यत शिक्षण असावे कृषी व फलोत्पादन योजना- 1. लाभार्थी आदिम जमातीचा असावा. अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल 2. पात्र व गरजू आदिम जमातीचे शेतकरी व शेतमजूरांना योजनेचा लाभ देण्यात येईल. वन जमीनीचे पट्टे मिळालेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. 3. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे पिण्याचे पाणी / विहिरीचे बांधकाम / चेक डॅम / सिंचाई योजना - 1. लाभार्थी आदिम जमातीचा असावा 2. त्याचे कडे किमान स्वत:ची दीड एकर जमीन असावी. लाभार्थ्याची जमीन लाभक्षेत्रात असल्याबाबत त्याचे नांवे 7/12 उतारा असणे आवश्यक 3. लाभार्थ्याच्या स्वत:च्या जमीनीत बोअरवेल नसावी घरकुल- 1. लाभार्थी हा कातकरी, कोलाम, माडिया गोंड या आदिम जमातीचा असावा. त्याची स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी 2. लाभार्थ्यास पक्के घर नसावे तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा

1. शासन निर्णय व शासनाने निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनूसार व कातकरी, माडिया व कोलाम गोंड जमाती लाभार्थी 2. टिएसपी, ओटीएसपी, माडा, मिनीमाडा या क्षेत्रात असलेली आदिम जमातींची गावा अंतर्गत येत असलेले व आदिम जमाती अंतर्गत येत असलेले लाभार्थी आरोग्य विषयक योजना - 1. ज्या गावांमध्ये आदिम जमातीचे वास्तव्य मोठया प्रमाणात आहे. ज्या गावात अशी शिबीरे झालेली नाही तसेच कुपोषण व तत्सम दुर्धर आजार उद्भवलेले आहेत अशी गावे. रोजगार व उत्पन्न वाढीच्या योजना- 1. लाभार्थी आदिम जमातीचा असावा अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल 2. लाभार्थीचे कमीत कमी 10 वी पर्यत शिक्षण असावे कृषी व फलोत्पादन योजना- 1. लाभार्थी आदिम जमातीचा असावा. अपंग व महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल 2. पात्र व गरजू आदिम जमातीचे शेतकरी व शेतमजूरांना योजनेचा लाभ देण्यात येईल. वन जमीनीचे पट्टे मिळालेल्या शेतक-यांना प्राधान्य देण्यात येईल. 3. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे पिण्याचे पाणी / सिंचाई योजना - 1. लाभार्थी आदिम जमातीचा असावा 2. त्याचे कडे किमान स्वत:ची दीड एकर जमीन असावी. लाभार्थ्याची जमीन लाभक्षेत्रात असल्याबाबत त्याचे नांवे 7/12 उतारा असणे आवश्यक 3. लाभार्थ्याच्या स्वत:च्या जमीनीत बोअरवेल नसावी घरकूल- 1. लाभार्थी हा कातकरी, कोलाम, माडिया गोंड या आदिम जमातीचा असावा. त्याची स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जागा असावी 2. लाभार्थ्यास पक्के घर नसावे तसेच शासनाच्या कोणत्याही विभागामार्फत अथवा जिल्हा परिषदेमार्फत घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा अ. लाभार्थी हा कातकरी, कोलाम व माडिया या जमातीचा असल्याचा आवश्यक पुरावा/ कागदपत्रे ब. शासन निर्णय व शासनाने वेळोवेळी निर्गमित करुन दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे योजनेच्या निकषानूसार आवश्यक कागदपत्रे

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/AdimJamati.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प