English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - युवकांसाठी - आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त जिल्ह्यांतील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी 'आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना'

योजनेचे स्वरूप

गडचिरोली व गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी व राज्यातील इतर भागातील रूढी, परंपरा, संस्कृती, शिक्षण व शेती इत्यादीचे दर्शन घडविण्यासाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबविण्यात येते. यात सहभागी मुले-मुली नक्षलप्रभावित क्षेत्रांमध्ये बदल घडवतील व सर्वांगीण विकासाकडे अग्रेसर होतील असा उद्देश ठेवून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागातील एकूण 40 मुला-मुलींचा 1 गट व अधिका-यांचा समावेश असलेले पथक याप्रमाणे एका वर्षात 10 गटांना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात येते.

गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थी

संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय