English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - युवकांसाठी - मोटार वाहन चालक प्रशिक्षण देणे

अनुसूचित जमातीच्या युवकांना मोटार वाहन चालक प्रशिक्षण देणे

योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील वाहन चालक संदर्भातील रिक्त पदांचा अनुशेष भरून निघावा व पर्यायाने अनुसूचित जमातीच्या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्यात परिवहन महामंडळ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पांढरकवडा, ता.केळापूर, जि.यवतमाळ व ता.वडसा, जि.गडचिरोली व ता.शहादा, जि.नंदूरबार येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. मोटार वाहन चालक प्रशिक्षण सत्राचा कालावधी प्रथम सत्र एप्रिल ते सप्टेंबर व द्वितीय सत्र ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत प्रशिक्षणार्थींना तांत्रिक, अतांत्रिक चालक विषयक बाबींवर सखोल प्रशिक्षण देण्यात येत, तसेच प्रशिक्षणार्थ्यांनी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांच्याकडून सराव करून घेण्यात येतो.

1. उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा. 2. उमेदवाराचे वय 23 ते 25 वर्षे 3. शैक्षणिक पात्रता – किमान इयत्ता 8 वी उत्तीर्ण असावा. 4. शारिरीक पात्रता - युवक उंची 163 सें.मी. असावी. 5. उमेदवार शारिरीक व मानसिकदृष्टया वाहनचालकाचे काम करण्यास सक्षम असावा. 6. अवजड वाहन चालविण्याचा परवाना व कमीत कमी 2 वर्षांचा अवजड वाहन चालविण्याचा अनुभव असावा.

1. अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो 2. दारिद्रय रेषेखालील प्रमाणपत्र 2002-2007 3. उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक 4. रहिवासी दाखला 5. शैक्षणिक पात्रता 6. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला 7. जातीचा दाखला 8. शासन वेळोवेळी मागणी करील त्याबाबतचे हमीपत्र

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/AV48.pdf

संबंधित केंद्राचे प्रभारी प्रमुख, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय