1) भारत सरकार शिष्यवृत्ती योजना
2) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
3) परदेशी शिक्षण / शिष्यवृत्ती
4) शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क अदा करणे
5) व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे
6) इयत्ता 8 वी ते 12 वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती व वाहतूक भत्ता देणे
7) वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करणे
अपंग व्यक्तींच्या अडचणी लक्षात घेवून त्यांच्याकडे पाहण्याचा समाजाचा हेतू लक्षात घेऊन ते शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांना इतरांच्या बरोबरीने स्पर्धा करून शासनामार्फत मिळणारे फायदे मिळावेत आणि त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी याकरिता शासनाने सन 2003-04 या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जमातीच्या इ. 8 वी ते 12 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना दरमहा रुपये 500/- या दराने शिष्यवृत्ती व शाळेत जाण्या-येण्याकरिता रुपये 100/- प्रमाणे वाहतूक भत्ता देण्यात येतो.
• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. • विद्यार्थी हा अपंग असावा.
• मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र • सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र • अपंग असल्याबाबतचे सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/handicap_students_scholarship.pdf
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय