English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शिष्यवृत्ती, फी व निर्वाह भत्ता - शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क अदा करणे

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क/परिक्षा शुल्क अदा करणे

योजनेचे स्वरूप

ज्या विद्यार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाखापेक्षा जास्त असल्याने भारत सरकार शिष्यवृत्ती करिता अपात्र ठरल्याने असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून निर्वाहभत्त्यासह शिक्षण विभागाने/विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्कांपैकी फक्त शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क अदा करण्यात येतात. सन 2012-13 पासून सदर योजना ही ऑनलाईन करण्याकरिता https://etribal.maharashtra.gov.in ही वेबसाईट विकसित करण्यात आलेली आहे.

• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा जास्त असावे. • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून/मंडळाकडून सुरू असलेल्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेला असावा. • विद्यार्थी हा पूर्णवेळ नोकरीवर नसावा.

• मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र. • सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित करण्यात आलेले जातीचे प्रमाणपत्र व व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक. • तहसीलदार यांचेकडून प्रमाणित करण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला/फार्म 16. • आधारकार्डाची छायांकित प्रत. • बॅंकेच्या पासबुकाची छायांकित प्रत.

सन 2017-18 पासुन सदर योजना ही ऑनलाईन अर्जा करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने Maha D.B.T. portal विकसीत केलेले आहे.

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय