English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण

आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम

योजनेचे स्वरूप

आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता विभागांतर्गत व विभागबाह्य आयोजन करुन वेगवेगळ्या प्रकारच्या विषयनिहाय प्रशिक्षण दिले जाते. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत राज्यात 100% गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता आले पाहिजे, यास्तव ज्ञानरचनावाद संकल्पनेवर आधारित गणित संबोध कार्यशाळा व प्रशिक्षणाचे व्यवस्थापन याबाबतचे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेमार्फत आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांना देण्यात येते.

शासकीय आश्रमशाळेतील सर्व प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, अधीक्षक/ अधीक्षिका या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यास पात्र राहतील.

प्रशिक्षणस्थळात नमुद केल्याप्रमाणे.