English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - आश्रमशाळा मध्ये क्रीडा स्पर्धा

आश्रमशाळांमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे

योजनेचे स्वरूप

1. क्रीडा व युवक संचालनालयाप्रमाणेच आदिवासी विकास विभागाकडून आश्रमशाळेतील 15, 17, 19 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्पस्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. 2. सदर खेळ प्रकारात सांघिक स्पर्धा जसे की, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, रिले तसेच मैदानी (वैयक्तिक) जसे की, धावणे 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 600 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 3000 मीटर, 5000 मीटर, लांब उडी, उंच उडी, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक याप्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतात. 3. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि. 22 एप्रिल, 2015 च्या शासन निर्णयान्वये आदिवासी विभागाने आयोजित केलेल्या राज्यस्तर शालेय क्रीडास्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना 25 वाढीव क्रीडा गुण देण्यात येतात. 4. तसेच सदर स्पर्धेत पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना शासन सेवेत नोकरीसाठी ठेवलेल्या 5% आरक्षणाचा फायदा मिळतो.

शासकीय/अनुदानित आश्रमशाळेत प्रवेशित 14, 17, 19 वर्षे या वयोगटातील विद्यार्थी.

• खेळाडू ओळखपत्र • बोनाफाईड सर्टीफीकेट • आधार कार्डची छायाप्रत.

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/olakhpatra vibhagiy.pdf

संबंधित मुख्यध्यापक.