English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे

योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जमातीतील साक्षरतेचे प्रमाण 52.2 टक्के (पुरुष 67 टक्के व स्त्रिया 43.1 टक्के) आहे. उच्च शिक्षणात प्रामुख्याने इंग्रजीचा वापर जास्त होत असल्याने अनुसूचित जमातीचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत आहेत व उच्च शिक्षणाच्या बदललेल्या वातावरणात त्यांना जुळवून घेणे कठीण होत आहे. जागतिकीकरणाच्या सध्याच्या वातावरणात इंग्रजीचे महत्त्व वाढत असून, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमांकडे थोड्या प्रमाणात वाढत असला, तरी शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित शाळेत शिक्षण घेणे त्यांच्या आर्थिक कुवतीपलीकडे आहे. यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणे आवश्यक झाले आहे. यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

1. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणा-या मुलांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु. 1.00 लक्ष इतकी असावी. 3. या योजने अंतर्गत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच अनुसूचित जमातीमधील विधवा/घटस्फोटित/निराधार/परित्यक्ता व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांची प्राधान्याने निवड करण्यात येते. 4. प्रवेशाच्या वेळेस त्याचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असावेत.किंवा 6 वर्षे पूर्ण होण्यास 15 दिवस कमी असल्यासही पात्र राहील.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्याबाबत आवश्यक कागदपत्र. 2. उत्पन्नाचा दाखला. 3. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला.

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.