English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - इंग्रजी माध्यमाची निवासी आश्रमशाळा, नवेगांव, जिल्हा-गडचिरोली

इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा

योजनेचे स्वरूप

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील सामजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने राज्यात सन 1953-54 पासून आश्रमशाळा चालविण्याची योजना राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने सन 2003-04 व सन 2004-05 या वर्षापासून या विभागात गडचिरोली प्रकल्पात जिल्ह्याच्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाची निवासी आश्रमशाळा इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंत सुरू करण्यात आली आहे. सदर निवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन, गणवेश, आंथरुण, पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2. प्रवेशाच्या वेळेस त्याचे वय किमान 6 वर्षे पूर्ण असावेत.किंवा 6 वर्षे पूर्ण होण्यास 15 दिवस कमी असल्यासही पात्र राहील.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचे प्रमाणपत्र. 2. प्रवेशार्थी विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला.

संबंधित प्रकल्प अधिकारी, गडचिरोली

1. प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली. 2. मुख्याध्यापक, इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा, गडचिरोली.