English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल

एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल

योजनेचे स्वरूप

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने नवव्या पंचवार्षिक योजनेत भारतीय संविधानाच्या कलम 275(1) अन्वये वितरीत होणाऱ्या निधीतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर निवासी शाळा स्थापन करण्याचा केंद्र शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्याअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून शिक्षण मिळावे याकरिता एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल (निवासी शाळा) ही केंद्रपुरस्कृत योजना राबविली जात आहे. अशा शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत (सी.बी.एस.ई. अभ्यासक्रमानुसार) शिक्षण देण्यात येते. नागपूर विभागात इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळा खालीलप्रमाणे आहेत. 1. खैरी परसोडा, ता.रामटेक, जि.नागपूर 2. बोरगांव, जि.गोंदिया 3. तुमरगुंडा, ता.एटापल्ली, जि.गडचिरोली 4. देवाडा, ता.जि.गोंदिया 5. चामोर्शी, जि.गडचिरोली (सद्यस्थित-गडचिरोली येथे) 6. गेवर्धा, ता.कुरखेडा, जिल्हा- गडचिरोली (सदर शाळा चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 1 ली पासून सुरू करण्यात येत आहे.) (सद्यस्थित शासकीय आश्रमशाळा सोनसरी) अशा निवासी शाळेत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन, गणवेश, आंथरुण-पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2. शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता 5 वीची परीक्षा उत्तीर्ण होवून स्वतंत्र प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. ( प्रवेश पूर्व स्पर्धा परीक्षा माहे एप्रिल-मे मध्ये त्या-त्या जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प क्षेत्रात घेण्यात येतात). 3. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांच्या कुटुबांची वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रु. 1.00 लक्ष इतकी असावे.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्याबाबत आवश्यक कागदपत्र. 2. इयत्ता 5 वी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका. 3. उत्पन्नाचा दाखला.

संबंधित प्रकल्प अधिकारी, संबंधित मुख्याध्यापक, एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल.