1) केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना
2) कौशल्य विकास कार्यक्रम
3) विशेष केंद्रीय सहाय्य योजना
4) आदिम जमातीचे संरक्षण तथा विकासाच्या योजना
5) भारतीय संविधानाचे अनुच्छेद २७५ (१) अंतर्गत योजना
6) कन्यादान योजना
7) पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण देणे
8) मोटार वाहन चालक प्रशिक्षण देणे
9) आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना
गडचिरोली व गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यातील किशोरवयीन मुला-मुलींच्या उन्नतीसाठी व राज्यातील इतर भागातील रूढी, परंपरा, संस्कृती, शिक्षण व शेती इत्यादीचे दर्शन घडविण्यासाठी “आपला महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजना” राबविण्यात येते. यात सहभागी मुले-मुली नक्षलप्रभावित क्षेत्रांमध्ये बदल घडवतील व सर्वांगीण विकासाकडे अग्रेसर होतील असा उद्देश ठेवून गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षल प्रभावित भागातील एकूण 40 मुला-मुलींचा 1 गट व अधिका-यांचा समावेश असलेले पथक याप्रमाणे एका वर्षात 10 गटांना महाराष्ट्र दर्शन घडविण्यात येते.
गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागातील शालेय विद्यार्थी
गरज नाही
संबंधित एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय