मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - युवकांसाठी - पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण देणे

अनुसूचित जमातीच्या युवक/युवतींना पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण देणे

योजनेचे स्वरूप

राज्यातील अनुसूचित जमातीच्या युवकांना राज्य पोलीसदल व लष्कर तथा तत्सम विविध सुरक्षा दलातील अनुशेषांतर्गत संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यात इगतपूरी, जव्हार, नंदूरबार, राजूरा, आंबेगाव, किनवट, देसाईगंज, धारणी, अकोले या 9 ठिकाणी पोलीस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. शारीरिक व शैक्षणिकदृष्ट्या योग्य असणा-या आदिवासी तरुण/ तरुणींना त्यांच्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती होईल व त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून सैन्यदल किंवा पोलीस दलात भरती होणेसाठी भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. आदिवासी प्रशिक्षणार्थींना जेवण, निवास, गणवेश, खेळाचे साहित्य, बुट-मोजे, अंथरूण-पांघरूण इत्यादी सुविधा मोफत पुरविल्या जातात. सैन्य तथा पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील एका प्रशिक्षण सत्राचा कालावधी 4 महिन्यांचा असून प्रथम सत्र एप्रिल ते जुलै, द्वितीय सत्र ऑगस्ट ते नोव्हेंबर व तृतीय सत्र डिसेंबर ते मार्च या कालावधीत आयोजित करण्यात येते. एका प्रशिक्षण सत्रात 50 युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येते.

1. उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा. 2. उमेदवाराचे वय 18 ते जास्तीत जास्त 23 वर्षे असले पाहिजे. 3. शैक्षणिक पात्रता - इयत्ता 12 वी पास 4. शारीरिक पात्रता-युवकांची उंची 165 सें.मी., छाती 79 से.मी.(न फुगवता) आणि युवती उंची 155 सें.मी., छाती 79 से.मी. (न फुगवता)

1. 10 वी पास गुणपत्रिका 2. 12 वी पास गुणपत्रिका 3. पदवीधर गुणपत्रिका 4. जातीचा दाखला 5. शाळा सोडल्याचा दाखला 6. अनुभवाचे दाखले (असल्यास) 7. फोटो (पासपोर्ट साईज) 8. वैद्यकीय अधिका-यांकडून प्रमाणित केलेला शारिरीकदृष्ट्या सक्षम असल्याचा दाखला (Fitness Certificate) 9. क्रीडाविषयक माहिती/खेळातील प्राविण्य

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/AV48.pdf

संबंधित केंद्राचे प्रभारी प्रमुख संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय