1) भारत सरकार शिष्यवृत्ती योजना
2) सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
3) परदेशी शिक्षण / शिष्यवृत्ती
4) शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क अदा करणे
5) व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे
6) इयत्ता 8 वी ते 12 वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती व वाहतूक भत्ता देणे
7) वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करणे
व्यावसायिक/वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शिक्षण अभ्यासक्रमापेक्षा जास्त खर्च येतो त्यामुळे बरेच विद्यार्थी खर्चिक व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार होत नाहीत अथवा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे मध्येच शिक्षण सोडून देतात. वैद्यकीय शिक्षण व संलग्न शिक्षणाकरिता खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.\nसदर शिष्यवृत्ती ही खालील अभ्यासक्रमांकरिता दिली जाते. अ) आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग) ब) उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असणारे अभियांत्रिाकी, औषधीनिर्माण, एच.एम.सी. वास्तूशास्त्र. एम.बी.ए. व एम.सी.ए. क) कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्सव्यवसाय विभागाअंतर्गत पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम
• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. • आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम (वैद्यकीय, दंत, होमिओपॅथी, युनानी, आयुर्वेद, भौतिकोपचार, व्यवसायोपचार व नर्सिंग ) इत्यादी मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असावा. • त्याची वर्तणूक, हजेरी व प्रगती समाधानकारक असावी.
• मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र • सक्षम अधिकारी यांचेकडून प्रमाणित करण्यात आलेले जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक • तहसीलदार यांचेकडून प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला/ फार्म 16 • आधारकार्डाची छायांकित प्रत • बॅंकेच्या पासबुकाची छायांकित प्रत
http://etribal.maharashtra.gov.in/
संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय