मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शिष्यवृत्ती, फी व निर्वाह भत्ता - व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे

व्यावसायिक पाठ्यक्रमात शिकणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे

योजनेचे स्वरूप

उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसाधारण शिक्षण अभ्यासक्रमापेक्षा जास्त खर्च येतो त्यामुळे बरेच विद्यार्थी खर्चिक व्यावसायिक शिक्षण घेण्यास तयार होत नाहीत अथवा आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे मध्येच शिक्षण सोडून देतात. याकरिता आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या इतर आर्थिक सवलतींशिवाय व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणा-या जादा खर्चाची तोंडमिळवणी करता यावी म्हणून शासन निर्णय क्र.आवग 1204/प्रक्र.18/का.6 दि.24 ऑगस्ट, 2004 अन्वये खालीलप्रमाणे निवाहभत्ता देण्यात येतो. 1. 4 ते 5 वर्षाचे अभ्यासक्रम (वैद्यकिय /अभियांत्रिक/कृषी/ पशुवैद्यकिय /वास्तुशास्त्र) ------- वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकरीता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 700/- वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 1000/- 2. 2 ते 3 वर्षाचा अभ्यासक्रम (अभियांत्रिक पदविका/एम.बी.ए/एम.एस डब्ल्यु -------- वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकरीता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 500/- वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 700/- 3. 2 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे अभ्यासक्रम (बी.एड,डी.एड) ------- वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याकरीता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 500/- वसतिगृहात न राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता निर्वाह भत्ता (प्रतीमाह दर) रुपये 500/-

• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे. • मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून/ मंडळाकडून सुरू असलेल्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतलेला असावा. • विद्यार्थी हा पूर्णवेळ नोकरीवर नसावा.

• मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र • सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र व व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यास जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक • तहसीलदारांकडून प्रमाणित करण्यात आलेला उत्पन्नाचा दाखला/ फार्म 16 • आधारकार्डाची छायांकित प्रत • बॅंकेच्या पासबुकाची छायांकित प्रत

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय