मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शिष्यवृत्ती, फी व निर्वाह भत्ता - परदेशी शिक्षण / शिष्यवृत्ती

अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

योजनेचे स्वरूप

आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र. आदिशी-1203/प्र.क्र 76 /का.12 दिनांक 31 मार्च 2005 नुसार शासनाने राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या खालील प्रमाणे 10 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना 2005-2006 या वर्षापासून मंजूर करण्यात आलेली आहे. 1. एम.बी.ए. स्तर: पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-2 एकुण लाभार्थी-2 2. वैद्यकीय अभ्यासक्रम स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-1 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-2 3. बी. टेक (इंजिनिअरिंग) स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-1 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-2 4. विज्ञान स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-1 5. कृषी स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-1 एकुण लाभार्थी-1 6. इतर विषयाचे अभ्यासक्रम स्तर: पदवी/पदव्युत्तर शिष्यवृत्ती संख्या: पदवी-0 पदव्युत्तर-2 एकुण लाभार्थी-2 आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्र पाशिशि-2015/प्र.क्र344 /का.12 दिनांक 16 मार्च 2016 नुसार सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून या योजनेअंतर्गत उत्पन्नाची मर्यादा रु 6.00 लक्ष करण्यात आलेली आहे.

• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असावा. • या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 35 वर्षे असावे, तथापि नोकरी करित असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा 40 वर्षे राहील, परंतु नोकरीत नसलेल्या उमेदवारास निवडीच्या वेळी प्राधान्य राहील. • सदर शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस (मुलगा/मुलगी) आणि एका अभ्यासक्रमासाठीच अनुज्ञेय होईल. • ज्या परदेशी विद्यापीठांचे जागतिक रॅंकिंग ( Latest QS world ranking) 300 पर्यंत आहे, अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील.

• विद्यार्थ्याचे अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र • सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेला उपन्नाचा दाखला (उत्पन्नाची मर्यादा रु 6.00 लक्ष) • परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विद्यापीठाचे पत्र व संबंधित विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टस् ची प्रत • परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या/शाखेतील /विभागातील दोन विद्यकनिष्ठ/फॅकल्टी यांचे शिफारसपत्र • अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणाऱ्या एकूण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र • विद्यार्थ्याचे आधारकार्ड

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/pardesi_shishyavruti.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प