मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शिष्यवृत्ती, फी व निर्वाह भत्ता - सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

योजनेचे स्वरूप

आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णय क्रमांक आविशी/2009/प्रक्र.20/का.12, दि.31 मे 2010 (अ) अन्वये इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक तसेच इतर किरकोळ खर्च भागविण्यासाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व-माध्यमिक शिष्यवृत्ती योजना शैक्षणिक वर्ष 2010-11 पासून लागू करण्यात आली आहे.\nसदर योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे वार्षीक दर (प्रती विद्यार्थी/विद्यार्थिनी) खालीलप्रमाणे आहे. 1 इयत्ता 1 ली ते 4 थी रु.1000/- 2 इयत्ता 5 वी ते 7 वी रु.1500/- 3 इयत्ता 8 वी ते 10 वी रु.2000/-

• विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. • विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न रुपये 1.08 लाख किंवा त्यापेक्षा जास्त नसावे. • अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याची उपस्थिती प्रतीमाह 80 टक्के असणे आवश्यक राहील. • शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, नामांकित शाळा, सैनिकी शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च शासनाकडून अदा करण्यात येत असल्यास अशा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्तीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

• मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या परीक्षेचे प्रमाणपत्र • शिष्यवृत्तीचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्याचे मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र • सरपंच किंवा ग्रामपंचायत यांचेद्वारा प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र • बॅंकेच्या पासबुकाची छायांकित प्रत

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/suran_motsav_sholarship.PDF

संबंधित मुख्याध्यापक, संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय