मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - इयत्ता १० व १२ वी मधील गुणवत्ता प्राप्त शाळांना विशेष प्रोत्साहनात्मक बक्षिसे

शासकीय/अनुदानित आश्रमशाळांना प्रोत्साहन योजना

योजनेचे स्वरूप

आदिवासी विकास विभागांतर्गत विभागीयस्तरावर चालविण्यात येणाऱ्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना विशेष प्रोत्साहनपर बक्षीसे देण्याची योजना आदिवासी विकास विभाग क्रमांक बीयुडी/पुरक मागण्या/प्रक्र. 42/का. 7/ दिनांक-08 ऑगस्ट, 2003 आणि शासन निर्णय क्रमांक शाआशा-2003/प्रक्र.102/का. 13/ दिनांक- 14 ऑगस्ट, 2003 अन्वये सुरू करण्यात आली आली आहे. ज्या अनुदानित आश्रमशाळा आदिवासी भागामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांकरिता उत्कृष्ट काम करतात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सदर योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत - • राज्यपातळीवर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना खालीलप्रमाणे बक्षीसे दरवर्षी दिली जातात. • प्रथम क्रमांक-5 लक्ष • द्वितीय क्रमांक-3 लक्ष • तृतीय क्रमांक- 2 लक्ष • विभागीय पातळीवर आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांना दरवर्षी खालीलप्रमाणे बक्षीसे दिली जातात. • प्रथम क्रमांक- 2.5 लक्ष • द्वितीय क्रमांक- 2 लक्ष • तृतीय क्रमांक- 1 लक्ष

1. सदर शासकीय/अनुदानित आश्रमशाळा आदिवासी विकास विभागाअंतर्गत मान्यता प्राप्त असावी. 2. संस्थेविरुद्ध व शाळेविरुद्ध न्यायालयीन/फौजदारी प्रकरणे नसावीत. 3. शाळेचा 3 वर्षांचा निकाल किमान 90%असावा. 4. शाळेतील विद्यार्थ्यांची मागील 3 वर्षाची उपस्थिती किमान 90% असावी. 5. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी, शौचालये, स्वच्छतागृहे, जेवण, नाश्ता, स्वयंपाकगृहे, क्रीडांगण, पक्की इमारत, फर्निचर, आंथरुण-पांघरुण, खेळाचे साहित्य, तसेच नियमानुसार देय असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध असाव्या. 6. वृक्षलागवड व संवर्धन कार्यक्रम यशस्विरित्या राबविलेले असावे. 7. मुलांमध्ये नैतिक शिक्षण व सर्वांगीण विकासाची प्रगती तपासण्यात यावी. 8. शाळेने केलेले सामाजिक कार्य व जवळचा ग्रामीण विकास पहावा. 9. शाळेमध्ये मुलांचे लैंगिक, शारीरिक व मानसिक शोषणाच्या तक्रारी नसाव्यात.

विहित नमुन्यात अर्ज

संबधीत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प