मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - व्यवसाय प्रशिक्षण केंद्र

शासकीय पोस्टबेसिक आश्रमशाळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करणेबाबत

योजनेचे स्वरूप

महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक एएससी-1093/प्रक्र.271/ का.13/ दि. 14 ऑगस्ट, 1997 आणि शासन निर्णय क्र.शाआशा-2003/प्र.क्र.107/का-13, दि.30 जानेवारी, 2004 अन्वये केंद्रीय अर्थसाहाय्य योजनेतून शासकीय आदिवासी पोस्टबेसिक आश्रमशाळा कोटगुल (जि.गडचिरोली), कसनसूर (जि.गडचिरोली), कवडस (जि.नागपूर) कडीकसा (जि.गोंदिया) देवाडा (जि.चंद्रपूर) या आश्रमशाळेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. अनुसूचित जमातीमधील बहुतांश मुले-मुली नोकरीसाठी आवश्यक असलेली किमान अर्हता प्राप्त करीत आहेत. तथापि आदिवासी वस्ती असलेला भाग हा डोंगराळ व दुर्गम असल्यामुळे व तेथील प्रतिकूल परिस्थितीमुळे या आदिवासी यु‍वकांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झालेले नसल्यामुळे या योजनेतून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची नावे- 1. इलेक्ट्रिशियन 2. ऑईल-इंजिन व इलेक्ट्रिक मोटार रिपेयरिंग 3. घड्याळ दुरुस्ती 4. टीव्ही, रेडिओ व ट्रांझिस्टर दुरुस्ती 5. मोटार मेकॅनिक 6. गवंडी काम (मिस्त्री) तसेच सदर प्रशिक्षण घेत असणाऱ्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या दिनांक- 05 मे, 2011 च्या शासन निर्णयान्वये दरमहा 700/- रुपये इतके विद्यावेतन अदा करण्यात येते.

• शासकीय/अनुदानितआश्रमशाळेत शिकणारा असावा. • विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. • हे विद्यार्थी इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण आवश्यक.

• उत्पन्नाचे प्रमाणपत्र • जातीचे प्रमाणपत्र • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

संबंधित मुख्याध्यापक, शासकीय पोस्टबेसिक आश्रमशाळा/ संबंधित प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.