मराठी
For Tribal Boys & Girls
Toll Free :1800 267 0007
शिक्षणाच्या योजना - शालेय शिक्षण - सैनिकी शाळा

आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी राज्यातील सैनिकी शाळांना जोडून जादा तुकडी सुरू करणे

योजनेचे स्वरूप

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना सैनिकी शाळेमध्ये शिक्षण देण्यासाठी इयत्ता 5 वीच्या वर्गामध्ये मुलांच्या सैनिकी शाळेमध्ये 45 आदिवासी मुलांना, मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये 45 आदिवासी मुलींना आणि ज्या सैनिकी शाळेस सह शिक्षणाची मान्यता देण्यात आलेली आहे अशा सैनिकी शाळेमध्ये 22 आदिवासी मुले आणि 23 आदिवासी मुली यांना प्रवेश देण्यात येत आहे. नागपूर विभागात 5 सैनिकी शाळा कार्यरत आहेत. सदर सैनिकी शाळामधील जादा तुकड्या सन 2008-09 या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आल्या आहेत. 1. भोसला मिलीटरी स्कूल, नागपूर. 2. स्व. निर्धनराव वाघाये-पाटील सैनिकी शाळा, लाखनी, जि.भंडारा. 3. वर्धमान सैनिकी शाळा (जुने नाव राणीलक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ) वडधामणा, ता. हिंगणा, जि. नागपूर 4. इंडियन मिलिटरी स्कूल, वर्धा. 5. गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली अशा सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांची निवास व्यवस्था, भोजन, गणवेश, अंथरुण, पांघरुण, पुस्तके, लेखन साहित्य इत्यादी सुविधा मोफत उपलब्ध आहेत.

1. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. 2. इयत्ता 4 थी ची परीक्षा उत्तीर्ण असावा.

1. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असल्याबाबत आवश्यक कागदपत्र. 2. इयत्ता 4 थी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका.

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय/ संबंधित प्राचार्य, सैनिकी शाळा.