English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - घरकुल - शबरी आदिवासी घरकुल योजना

अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी घरकुल योजना

योजनेचे स्वरूप

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.

1. लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा. 2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे. 3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील. 4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे. 5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल. 6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा खालीलप्रमाणे :- अ) ग्रामीण क्षेत्र - रु. 1.00 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र - रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र - रु. 2.00 लाख

घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख

1. अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो 2. जातीचे प्रमाणपत्र 3. रहिवासी प्रमाणपत्र 4. 7/12 उतारा व नमुना 8-अ 5. शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला 6. जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र 7. तहसिलदार यांचेकडून प्रमाणित उत्पन्नाचा दाखला 8. शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे 9. ग्रामसभेचा ठराव

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/AV46.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प